भारतात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण अनेक जण फटाके फोडून साजरा करत असतात. काही वेळा या फटाक्यांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. फटाके फुटताना दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. शिवाय काही वेळा फटाक्यांमुळे बाईकला आग लागण्यावचा धोका असतो. हे लक्षात घेऊन, आज आपण दिवाळीच्या फटाक्यांपासून बाइकचे संरक्षण कसे करू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
अशाप्रकारे फटाक्यांपासून सुरक्षित ठेवा बाईकला (फोटो सौजन्य: iStock)
दिवाळीच्या रात्री फटाक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या बाईकला कव्हर लावू नका. वास्तविक बाईक लोखंडापासून बनलेली असते आणि ती थेट ठिणगीतून आग पकडू शकत नाही.
बाईकला ओपन जागेत पार्क करू नका. तुमची बाईक पार्क करण्यासाठी जिथे फटाके जाळत नाहीत अशी जागा निवडा व तुमच्या बाईकला सुरक्षित करा.
अनेक जण दुचाकीजवळच फटाके वाजवत असतात. त्यामुळे दुचाकीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच मुलांना आपल्या वाहनांपासून दूर फटाके जाळण्यास सांगावे.
दिवाळीच्या काळात अचानक आगीची घटना घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या दुचाकीला आगीपासून वाचवण्यासाठी घरी फायर एक्सटिंग्विशर ठेवले पाहिजे.
अलीकडे अनेक स्मार्ट पार्किंग ॲप्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बाईकसाठी सुरक्षित पार्किंगची जागा शोधण्यात मदत करू शकतात.