कर्नाटकमधील बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोथमचा लग्नामधील लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ती तिच्या शरीरयष्टीमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. आजवर तिने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस, मिस साउथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस बेंगलुरु इत्यादी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. सोशल मीडियावर चित्राचा कांजीवरम साडीमधील लुक व्हायरल होत असल्यामुळे लाखो नेटकऱ्यांनी तिच्या लुकचे कौतुक देखील केले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नसमारंभात केलेल्या लुकबद्दल काही खास माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – instagram)
बॉडीबिल्डर वधू चित्रा पुरुषोथमचा लग्नातील अनोखा लुक सोशल मीडियावर चर्चेत

चित्रा पुरुषोथमने तिच्या लग्नात कांजीवरम सिल्क साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये ती शक्तिप्रदर्शन करताना दिसून आली आहे. तिने पिवळ्या आणि निळ्या रंगाचा काठ असलेली कांजीवरम साडी नेसली आहे.

कांजीवरम साडीवर तिने सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. त्यामध्ये नेकलेस, कानातले, मांग टिक्का, बांगड्या इत्यादी अनेक दागिने घातले आहेत. तिच्या दागिन्यांमध्ये राजेशाही आणि पारंपरिक डिझाइन्स आहेत.

चित्राने साडीला आणि चेहऱ्यावर सूट होईल असा सुंदर आणि उठावदार मेकअप केला आहे. डोळ्यांमध्ये काजळ, आयलायनर, डार्क भुवया, लाल रंगाची सुंदर चमकदार लिपस्टिक लावली आहे.

चित्राने तिच्या लग्नात कांजीवरम साडी नेसत शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अंगाभोवती योग्य पद्धतीने गुंडाळलेल्या साडीमुळे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय तिने केसांमध्ये वेणी घालत सुंदर पांढऱ्या फुलांचा गजरा घातला आहे.






