धनत्रयोदशीला दागिन्यांची आवर्जून खरेदी केली जाते. हा दिवस दागिने खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. पण हल्ली सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याने १ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करताना खूप जास्त विचार केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठी १ ग्रॅम सोन्याच्या नाजूक साजूक झुमक्यांच्या काही सुंदर आणि आकर्षक डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे कानातले कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
धनेत्रोदशीनिमित्त खरेदी करा १ ग्रॅम सोन्याचे नाजूक साजूक झुमके
हल्ली कमीत कमी वजनाचे दागिने खरेदी केले जात आहे. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे नाजूक साजूक झुमके खरेदी करू शकता. झुमक्यांमध्ये बारीक जाळीचे वर्क किंवा कट वर्क डिझाईन अतिशय सुंदर दिसते.
बाजारात साऊथ इंडियन डिझाईनमधील टेम्पल कानातले सुद्धा उपलब्ध आहेत. टेम्पल डिझाईन कानातले साडीवर उठून दिसतात. सौंदर्यात भर पाडण्यासाठी तुम्ही या डिझाईनचे झुमके खरेदी करू शकता.
कमी वजनाचे अनेक कानातले बाजारात उपलब्ध आहेत. बारीक बारीक मण्यांचे झुमके आणि मोठ्या आकारातील पाकळ्या किंवा वेली झुमक्यांमध्ये अतिशय सुंदर दिसतील.
काहींना खूप जास्त नाजूक दागिने घालायला आवडतात. त्यामुळे तुम्ही १ किंवा २ ग्रॅम वजनातील या डिझाईनचे झुमके खरेदी करू शकता.
नाजूक फुले आणि मोठ्या आकाराचे झुमके कानात घातल्यानंतर कानाची शोभा वाढवतात. या डिझाईनचे दागिने तुम्ही सणावाराच्या दिवशी परिधान करू शकता.