सोशल मीडियावर सध्या बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा यांच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. बिग बॉसचे प्रेक्षक सध्या प्रचंड आनंदामध्ये आहेत. मागील काही सीझनमध्ये बऱ्याचदा मेकर्सवर आरोप लावण्यात आले होते की, पात्र असलेला स्पर्धक विजेता झाला नाही, त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्स आणि शोला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा झाला आहे त्यामुळे पात्र सदस्याला विजेता बनवण्यात आले त्यामुळे सोशल मीडियावर मोठा जल्लोष व्यक्त केला जात आहे. आता बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा आणि फिनालेचे काही फोटो सोशल मीडियाला व्हायरल होत आहेत यावर एकदा नजर टाका.
फिनालेमधील बिग बॉस १८ चे काही खास फोटो. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले करणवीर मेहराच्या विजयाने संपला. ही संध्याकाळ प्रेक्षकांसाठी अतिशय रोमांचक आणि संस्मरणीय ठरली. शोचा होस्ट सलमान खानने त्याच्या शानदार स्टाइलने फिनालेला अधिक खास बनवले.
बिग बॉस १८ विजेता घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर करणवीर मेहराचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
बिग बॉस १८ चा फिनाले आणि विजेता घोषित झाल्यानंतर बिग बॉसच्या सेटवर जय सोनी त्याच्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्या दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फिनाले झाल्यानंतर बिग बॉसच्या सेटवर पापाराझीं आणि मीडिया पत्रकारांची प्रचंड गर्दी होती, यावेळी पत्रकारांच्या विनंतीवर करणवीर मेहरा आणि त्याची आई आणि बहिणीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
बिग बॉस १८ च्या फिनालेमध्ये विजेता करणवीर मेहराची आई आणि बहिणी या दोघीही उपस्थित होत्या, यावेळी सलमान खान त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसला.