आपण जे काही करतो त्याचे चांगले वाईट फळ हे आपल्याला मिळतेच. हिंदू धर्मात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकदा असे म्हटले जाते की, आई-वडिलांच्या कर्माची फळं ही पुढे जाऊन मुलांना भोगावी लागतात. हे खरंच आहे का आणि याबाबत प्रेमानंद महाराज काय सांगतात ते जाणून घेऊया.
आई-वडिलांच्या कर्माची फळं मुलांना भोगावी लागतात... प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
याबद्दल प्रेमानंद महाराज म्हणतात की, पालकांच्या कर्माचे फळ मुलांना भोगावे लागते हे खरं आहे.
प्रेमानंद महाराज म्हणाले की ज्याप्रमाणे लोक आपल्या मुलांना संपत्ती आणि संस्कृती देतात, त्याचप्रमाणे ते आपल्या कर्माचे फळ देखील आपल्या मुलांना देतात
महाराज पुढे म्हणाले की, मुलांना त्यांच्या पालकांच्या सत्कर्मांचे फळ चांगल्या संस्कारांच्या रूपात मिळते. त्याच वेळी, मुलांना त्यांच्या पालकांच्या वाईट कृत्यांचे परिणाम भोगावे लागतात आणि आयुष्यात त्रास देखील सहन करावा लागतो
प्रेमानंद महाराज म्हणाले की, जर पालकांना त्यांच्या मुलांसाठी आनंदी जीवन हवे असेल तर त्यांनी त्यांचे कर्म चांगले आणि शुद्ध ठेवले पाहिजे. यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल आणि त्यांच्या मुलांचे निश्चितच कल्याण होईल
जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले तर मुलांचे जीवनही आनंदी होईल आणि घरात कोणालाही कधीही समस्या येणार नाहीत. घरात नेहमीच शांती राहील, तुम्हाला फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवावा लागेल