कुलदीप यादव(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 ind vs pak final : भारतीय संघाने नुकताच आशिया कप २०२५ स्पर्धेचा किताब जिंकला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादव आणि तिलक वर्मा ही जोडी विजयाचे हीरो ठरले आहेत. तिलक वर्माने ६९ धावा केल्या तर कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन पाकिस्तानची कंबर मोडली. या सामन्यातील हीरो कुलदीप यादवने त्याच्या यशामागील गमक सांगितले आहे.
इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू न शकलेला भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव म्हणाला की, दुलीप ट्रॉफीमध्ये खूप गोलंदाजी केल्याने त्याला आशिया कपसाठी त्याची लय परत मिळवता आली. कुलदीपने ९.२९ च्या सरासरीने १७विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून स्पर्धा संपवली. दुबईमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ३० धावांत चार विकेट्स घेतल्या आणि विरोधी फलंदाजांना त्याच्या फिरकीत अडकवले. जेव्हा तुम्ही बराच काळ क्रिकेट खेळत नाही, तेव्हा तुम्हाला लय हवी असते, असे बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रिंकूशी झालेल्या संभाषणादरम्यान तो म्हणाला. दुलीप ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करण्याच्या माझ्याकडे खूप संधी होत्या, म्हणून जेव्हा मी स्पर्धेत आलो तेव्हा माझी गोलंदाजी नक्कीच चांगली होत होती.
हेही वाचा : IND W vs SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…
त्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना कुलदीप म्हणाला, “माझी भूमिका धावांवर नियंत्रण ठेवणे आणि मधल्या षटकांमध्ये विकेट घेणे ही होती. कर्णधाराला माझ्यावर खूप विश्वास होता आणि मी माझी भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. कुलदीपने वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यासोबत मिळून एक जबरदस्त फिरकी त्रिकूट तयार केला. या त्रिकूटाने त्यांच्या विविधतेने फलंदाजांना त्रास दिला.
तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी विकेट्स पडत असताना मैदानावर थांबून चांगलीभागीदारी रचली आणि भारताचा विजय अधिक सोपा केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. तिलकने दबावाखाली देखील उत्तम फलंदाजी केली आणि ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा फटकावल्या. दरम्यान, शिवम दुबेने देखील आक्रमक खेळ करत ३३ धावा काढून तो माघारी गेला. दुबेने विनोदाने म्हटले की, “मला वाटते की माझ्या बॅटनेही प्रतिसाद दिला; त्यांच्याकडे बोलण्यासाठी फारसे काही शिल्लक राहिले नव्हते.”