ख्रिसमस काही दिवांसावर येऊन राहिला आहे. संपूर्ण देशभर या सणाची तयारी सुरू आहे. या दिवशी भारतातील काही प्रसिद्ध चर्च आकर्षकपणे सजवले जातात आणि त्याठिकाणी विशेष धार्मिक सेवा आणि उत्सवांचे आयोजन होते. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही चर्चांची माहिती देत आहोत. भारतातील या चर्चला भेट देऊन तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी जाऊन एक अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता. ( फोटो सौजन्य: iStock)
Christmas 2025: 'हे' आहेत भारतातील प्रमुख चर्च, ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी खास सजवले जातात; मित्रपरिवारासह नक्की भेट द्या
सेंट पॉल कॅथेड्रल कोलकाता- कोलकाताथील विक्टोरियन शैलीतील वास्तुकला असलेले हे चर्च खूप प्रसिद्ध आहे. येथे ख्रिसमसच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, चर्च सेवांचे आयोजन केले जाते
बॉम जीझसची बॅसिलिका गोवा- गोव्यातील या यूनेस्को विश्व धरोहर स्थळावर सेंट फ्रांसिस जेवियर यांच्या अवशेषांची पूजा केली जाते. मध्यरात्री हे चर्च सुंदरपणे सजवले जाते, आणि तेथील धार्मिक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने इथे येतात
से कॅथेड्रल, गोवा- आशियातील सर्वात मोठ्या चर्चांपैकी एक असलेले से कॅथेड्रल गोव्यात स्थित आहे. ख्रिसमसच्या रात्री मध्यरात्रीचा कार्यक्रम आणि विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, आणि तेथे हजारों लोक सहभागी होतात
क्राइस्ट चर्च, शिमला- उत्तर भारतातील सर्वात जुन्या चर्चांपैकी एक असलेल्या क्राइस्ट चर्चमध्ये, ख्रिसमसच्या वेळी एक सुंदर वातावरण निर्माण होते. इथे विविध धार्मिक सेवा आणि सांगीतिक कार्यक्रम साजरे केले जातात
सेंट पीटर चर्च, केरळ- पारुमाला चर्च म्हणून प्रसिद्ध असलेल्या या चर्चात, क्रिसमसच्या वेळी शांत वातावरणात धार्मिक सेवा आयोजित केली जाते. हे चर्च बिशप मार ग्रेगोरियस मेट्रोपॉलिटन यांचे समाधीस्थान देखील आहे
सांताक्रूझ बॅसिलिका, कोच- कोच्ची किल्ल्याच्या परिसरात असलेल्या या बेसिलिकात, ख्रिसमसच्या दिवशी मध्यरात्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हे चर्च कोचीन सूब्याचे कॅथेड्रल चर्च आहे, आणि येथे भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात