दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे किडनी आणि लिव्हरवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनीमधील सर्व घाण स्वच्छ होईल. (फोटो सौजन्य – iStock)
विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
शरीर स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर लिंबू आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात., ज्यामुळे मूत्रपिंडात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते.
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीरात वाढलेली जळजळ कमी करते. तसेच अँटी-मायक्रोबियल गुणधर्म शरीराचा संसर्गांपासून बचाव करतात. हळदीचे दूध मूत्रपिंड आणि यकृतामध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यास मदत करतात.
निरोगी आरोग्यासाठी बीटरूट अतिशय फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि किडनी लिव्हर स्वच्छ होते.
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी पिण्याची सवय असते. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
कोथिंबीरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, यामुळे शरीरातील दाह कमी होतो. लिव्हर जाणीव किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करावे.