निरोगी आरोग्यासाठी शरीर स्वच्छ होणे अतिशय महत्वाचे आहे. कारण शरीरात साचलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते./ म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – iStock)
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पेयांचे करा सेवन
बीट आणि गाजराचा रस नियमित प्यायल्यास शरीर स्वच्छ होईल आणि शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी बीटचा रस प्रभावी ठरतो.
हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेलं कर्क्युमिन लिव्हरमधील जळजळ कमी करून फॅटी लिव्हरपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरतात.
कोरफडचा रस नियमित प्यायल्यास लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि लिव्हरचे कार्य सुधारते. कोरफडचा रस त्वचेसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित लिंबू पाणी प्यावे. यामध्ये असलेले विटामिन सी आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा प्रभावी ठरते. शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.
लिव्हरमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.