शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अशक्तपणा, थकवा, चक्कर, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात आर्यन युक्त पदार्थांचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात असलेले हिमोग्लोबिन शरीराला ऑक्सिजन पुरवण्यास मदत करतो. मात्र हिमोग्लोबिनची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या गुणकारी पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचे सेवन

खजुरांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आर्यन इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही खजूर आणि डाळिंबाचा वापर करून चविष्ट गोड चटणी बनवू शकता. खजूर डाळिंबाची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते.

काळ्या रंगाच्या तिळांचा आहारात फारसा समावेश केला जात नाही. मात्र काळे तीळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. काळ्या तिळांपासून बनवलेले लाडू नियमित खाल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघेल आणि कधीच चक्कर अथवा अशक्तपणा जाणवणार नाही.

नाचणी शरीराला आवश्यक प्रोटीन आणि जीवनसत्वे पुरवण्याचे काम करते. रोजच्या आहारात नाचणीची खिचडी, नाचणीचे सूप, नाचणीची भाकरी याशिवाय नाचणीपासून बनवलेल्या इतर पदार्थांचे नियमित सेवन करावे.

शरीरात निर्माण झालेली आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालकचे नियमित सेवन करावे. पालक डाळ किंवा पालकपासून बनवलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढेल.

संध्याकाळच्या वेळी किंवा जेवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही सॅलडचा समावेश करू शकता. गाजर आणि बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते, जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित गाजर बीट खावे.






