धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेले बदल आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोहचते. तर काही वेळा रक्तदाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुटून जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
High Blood Pressure च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'या' फळांचे आहारात करा सेवन
किवीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित किवी खावी.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाल्ले जाते. यामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण शरीरासाठी आवश्यक आहेत. कलिंगडमध्ये पोटॅशियम, लायकोपीन, विटामिन सी इत्यादी घटक आढळून येतात.
संत्र्यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी संत्र खावे.
केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. त्यामुळे नियमित आहारात केळ्याचे सेवन करावे.
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असतात. जे हृदयासाठी अतिशय महत्वाचे आहे. शरीरात वाढलेला रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळिंब खावे.