राज्यभरात सगळीकडे थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात थंड पदार्थांचे सेवन न करता शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या दिवसांमध्ये अनेकदा शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. काम करण्याची किंवा कुठे बाहेर जाण्याची इच्छा निर्माण होत नाही. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी आहारात करा 'या' सुपरफूडचे सेवन
पॉपकॉर्नमध्ये भरपूर फायबर आणि कार्बोहायड्रेट्स येतात, ज्यामुळे अधिक काळ शरीरातील ऊर्जा तशीच टिकून राहते. थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी पॉपकॉर्नचे सेवन करावे.
हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. गूळ खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
डार्क चॉकलेट सगळ्यांचं खूप आवडते. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, जे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात निर्माण झालेला थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करतात.
अशक्तपणा, थकवा इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. अशावेळी आहारात केळीचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच आरोग्य सुधरण्यासाठी मदत होते.