आजच्या तरुणांना बाईक घेताना दोन गोष्टींचं जास्त आकर्षण असतं. लुक्स आणि परफॉर्मन्स. पण काही बाईक्स अशा आहेत ज्या दिसायला तर अफलातून असतात, मात्र त्यांचा मायलेज खिशावर भारी पडतो. स्टायलिश डिझाइन, दमदार इंजिन आणि आधुनिक फीचर्स असूनही या बाईक्स दररोजच्या वापरासाठी फार महागड्या ठरतात. चला तर पाहूया अशा काही हाय-लुक पण लो-मायलेज बाईक्स.
कमी Mileage असलेले हटके बाईक. (फोटो सौजन्य : Social Media)

Royal Enfield Classic 350 क्लासिक लुक्स, दमदार आवाज आणि हायवेवर कमाल कंट्रोल. पण मायलेज? फक्त ३०–३५ किमी/लिटर. शहरात वापरणाऱ्यांसाठी खिशावर भार.

Jawa 42 रेट्रो स्टाइल आणि पॉवरफुल इंजिन ही या बाईकची ओळख आहे. मात्र मायलेज सुमारे ३३ किमी/लिटर इतकं मर्यादित आहे.

Yamaha R15 V4 युवकांच्या ड्रीम स्पोर्ट्स बाईकमध्ये गणली जाणारी ही बाईक परफॉर्मन्समध्ये नंबर वन, पण मायलेज फक्त ४० किमी/लिटरच्या आसपास.

KTM Duke 250 स्पीड आणि राइडिंग स्टाइलसाठी ओळखली जाणारी ही बाईक शहरात सरासरी ३० किमी/लिटर देते. दिसायला भारी पण पेट्रोलसाठी जरा जास्त प्रेम!

TVS Apache RR 310 सुपर स्पोर्टी डिझाइन, डिजिटल डिस्प्ले, आणि उत्कृष्ट कंट्रोल. मात्र मायलेज ३४–३६ किमी/लिटर, म्हणजे लुक्स भारी पण खिसा रिकामा.






