सर्वच महिलांना साडी नेसायला खूप आवडते. महिलांच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळी डिझाईन असलेल्या साड्या असतात. त्यातील सर्व महिलांच्या आवडीची साडी म्हणजे खण साडी. खण साडी नेसताना अतिशय चापून चोपून बसते. खणाची साडी नेसल्यानंतर खूप सुंदर लुक दिसतो. पण हल्ली अनेक महिला साडीचा वापर करून सुंदर ड्रेस शिवून घेतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खणाच्या साडीपासून ड्रेस शिवण्यासाठी काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स थोड्या युनिक असल्यामुळे सगळ्यांवर खूप सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-pinterest)
खणाच्या साडीचे सुंदर ड्रेस

खणाच्या साडीपासून शिवलेल्या ड्रेसमध्ये जर तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचा ड्रेस शिवून घेऊ शकता. अनारकली पार्टन सगळीकडे खूप फेमस आहेत.

तुम्हाला जर सणवारांसाठो खणाच्या साडीचा ड्रेस शिवून घ्याचा असेल तर या पद्धतीचा ड्रेस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या ड्रेसला शॉर्ट स्ट्रिप्स आहेत.

ज्या महिलांना नेहमी कुर्ती किंवा ड्रेस घालायला आवडतात, त्यांच्यासाठी ही डिझाईन अगदी बेस्ट आहे. खणाच्या साडीमध्ये डार्क रंग खूप उठावदार दिसतात.

रोजच्या वापरात घालण्यासाठी जर तुम्हाला शॉर्ट कुर्ती किंवा टॉप हवे असतील तर तुम्ही या डिझाइन्स शिवून घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक इतरांपेक्षा वेगळा दिसेल.

खणाच्या साडीपासून तुम्ही शॉर्ट वन पीस सुद्धा शिवून घेऊ शकता. शॉर्ट वन पीस घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात.






