महाराष्ट्रात आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नावाचा जप करत वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. एकादशीनिमित्त विठुरायाचे मंदिर देखील सजवण्यात आलं आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची पत्नी लता शिंदे आणि इतर सहकाऱ्यांसह विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – X)
आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेनी घेतले विठ्ठल-रखुमाईचं दर्शन, पाहा खास फोटो
जेष्ठ महिन्यातील महत्त्वाच्या एकादशीपैकी एक म्हणून आषाढी एकादशी ओळखली जाते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासह वडाळा येथील प्राचीन विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन विठुरायाची पुजा केली. १६ व्या शतकातील हे मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक अमेय घोले तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित होते.
याशिवाय आज आषाढी एकादशीनिमित्त कल्याण चॅरिटी ट्रस्टच्यावतीने बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञान दिंडी'त देखील एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी आमदार प्रमोद हिंदुराव, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण पश्चिम जिल्हाप्रमुख रवी पाटील, राजेंद्र चौधरी, बिर्ला कॉलेज आणि कल्याण चॅरिटी ट्रस्टचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.