मधुमेह आजाराची लक्षणे दिसू लागल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे चवीला कमी गोड असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आरोग्यासाठी ड्राय फ्रुट गुणकारी आहेत. पण सतत ड्रायफ्रूटचे सेवन केल्यास आरोग्यावर त्याची गंभीर परिणाम दिसू लागतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी आहारामध्ये गोड असलेल्या ड्रायफ्रूटचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्यास सुरुवात होईल. आज आम्ही तुम्हाला मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या ड्रायफ्रूटचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मधुमेह असलेल्या रुग्णांनी 'हे' ड्रायफ्रुटस खाऊ नये
मनुका चवीला गोड असतात. यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. रक्तातील साखरेचे प्रमनवाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
जर्दाळूमध्ये नैसर्गिक साखरेचा गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी जर्दाळू हे ड्रायफ्रूट खाऊ नये.
क्रॅनबेरीमध्ये नैसर्गिक साखर असते. नैसर्गिक साखर असलेल्या फळांमुळे झपाट्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. क्रॅनबेरी हे ड्रायफ्रूट मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वाळवलेले आंबा हानिकारक ठरू शकतो. या आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. वाळलेला आंबा खाललने झपाट्याने रक्तातील साखर वाढू लागते.
अंजीरमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. चवीला गोड असलेले अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी अंजीरचे सेवन करू नये.