कुरुक्षेत्राच्या युद्धात विविध युद्धरचना वापरण्यात आल्या होत्या. महाभारतात कौरव आणि पांडवांच्या दरम्यान भयंकर युद्ध पाहिले गेले. या युद्धामध्ये अंतः पांडवांचा जरी विजय झाला तरी कौरवांनीही पांडवांच्या अपयशासाठी मोठी रणनीती आखली होती. मुळात कौरवांकडे पांडवांपेक्षा भले मोठे सैन्य होते. या युद्धात पांडवांनी बाजी मारली पण विविध व्यूहरचना दोन्ही गटाकडून रचण्यात आल्या होत्या. व्यूहरचनेचे आयोजन शत्रूने केलेल्या व्यूहरचनेच्या अनुसार केली जाते, जेणेकरून शत्रूवर विजय प्राप्त करणे शक्य होईल आणि सोपे होईल.
फोटो सौजन्य - Social Media

वज्रव्युह म्हणजे छातीमध्ये असणारा पिंजरा. तीन रंगांमध्ये सैन्यरचना केली जाते. प्रत्येक रांगेत मध्यभागी महारथी असतो आणि शेवटी राखीव सैन्याला उभे केले जाते.

पक्षासाठी दिसरणारी ही क्रौंचव्यूह फार घातक मानली जाते. या व्यूहरचनेत महारथी पुढे असतात तर राखीव सैन्य पंखांप्रमाणे शेजारी पसरलेले असतात. राखीव सैन्य आणि छावणी मागे असते.

गरुडव्युह जरी पक्षासारखी असली तरी तिला पाहता गरुडाचा भास होतो कारण या रचनेत सैन्य एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेले असते.

चक्रव्यूह हाच तो व्यूह ज्याने अभिमन्यूचे प्राण घेतले. प्रतिस्पर्धी या गोल व्यूहात अडकतो आणि फसला जातो.

शत्रूवर सर्व बाजूंनी आक्रमण करून शत्रूसैन्य नष्ट करणे हा या अर्धचंद्रव्यूहाचा प्रमुख हेतू आहे.






