• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Amruta Khanvilkar Upcoming Hindi Web Series Taskaree Releasing On Netflix

अमृता खानविलकरची नव्या वर्षात धमाकेदार सुरुवात! पहिल्यांदाच दिसणार “तस्करी”मध्ये अँक्शन भूमिकेत

अभिनेत्री अमृता खानविलकर नव्या वर्षात एका धमाकेदार अँक्शन भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. "तस्करी" ही आगामी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमृताने आपल्या भूमिकेबद्दल मत देखील मांडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 08, 2026 | 10:53 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमृता खानविलकरची नव्या वर्षात धमाकेदार सुरुवात
  • पहिल्यांदाच दिसणार “तस्करी”मध्ये अँक्शन भूमिकेत
  • अमृता खानविलकरचे आगामी प्रोजेक्ट्स
 
अनेक वर्षानुवर्षे वैविध्यपूर्ण माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी बहुगुणी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या वर्षाची सुरुवात अमृताने एकदम दमदार पद्धतीने केली आहे. ती आता लवकरच बहुप्रतीक्षित वेब सीरिज “तस्करी” मध्ये अँक्शन भूमिकेत दिसणार आहे. ज्याचा नुकताच भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. “तस्करी” येत्या 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही एक थरारक अ‍ॅक्शन पॅक सीरिज आहे. या सीरिज मध्ये बॉलीवूडचा बिग स्टार इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी केले आहे.

‘तस्करी’ वेब सीरिज आणि स्वतःच्या पात्राबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “तस्करी” चा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला आहे. माझ्यासाठी 2025 ची सुरुवात देखील धमाकेदार होती कारण मागील वर्षी जानेवारीमध्येच मी तस्करीच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात तिच्या रिलीजने होणार आहे याहून नवीन वर्षाची काय सुंदर सुरुवात होऊ शकते, तस्करीचा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय ठरला आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी मला ऑडिशनही द्यावं लागलं नाही. कास्टिंग डायरेक्टर विकी सदानाह यांच्या माध्यमातून माझी नीरज सरांशी भेट झाली मी एक सीन सादर केला आणि त्यांना तो खूप आवडला आणि तिथेच तस्करीची गोष्ट पक्की झाली”. असे अमृता म्हणाली आहे.

‘हातात तलवार अन् रक्तात माखलेला चेहरा…’ ‘द ब्लफ’ मधील प्रियांका चोप्राचा लूक व्हायरल, चाहत्यांची वाढली उत्सुकता

अमृता सारखी बहुआयामी अभिनेत्री चित्रीकरणाच्या विशेष अनुभवाबद्दल सांगताना पुढे म्हणाली, “ही सीरिज माझ्या कारकिर्दीतील पहिलीच अ‍ॅक्शन वेब सीरिज आहे आणि म्हणून माझ्या संपूर्ण प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सीरिजमध्ये मी भरपूर अ‍ॅक्शन सीन केले आहेत. माझी व्यक्तिरेखा ‘मिताली’ नावाची आहे. ही मुलगी खूपच स्ट्रॉंग आणि कस्टम्स टीममधील मी एक महत्त्वाची सदस्य आहे. मितालीच्या भूमिकेत शिरून स्वतःचा हा नवा पैलू अनुभवताना मला खूप आनंद झाला आणि यातून एक नवी अमृता मला सापडली आहे.”

नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं हा अमृतासाठी एक शिकण्याचा अनुभव

नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, ‘नीरज सर एखादा सीन ज्या पद्धतीने विचारात घेतात आणि साकारतात ते अप्रतिम आहे. त्यांच्या सेटवर प्रत्येक क्षण वेगवान आणि ऊर्जेने भरलेला असतो. पुढे काय होणार याची कलाकारांना कायमच उत्सुकता असते. जणू थिएटर करत असल्यासारखं वाटतं लांब टेक्स, अनेक हालचाली आणि एका फ्रेममध्ये अनेक कलाकार. मोठ्या जमावाचे दृश्य हाताळण्यात ते खरोखरच तरबेज आहेत.’

रितेश देशमुखचा ‘Masti 4’ कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

२०२६ वर्षाची दिमाखदार सुरुवात करताना विशेष बाब म्हणजे अमृताचा नेटफ्लिक्स सोबत हा पहिला वहिला प्रोजेक्ट आहे. या स्वप्नवत संधी बद्दल बोलताना अमृता म्हणाली, “नेटफ्लिक्स सारखा प्लॅटफॉर्म आणि नीरज पांडे यांच्यासारखे निर्माते हा दुहेरी योग जुळून आला आणि अशा प्रोजेक्टसोबत वर्षाची सुरुवात होणं खूप खास वाटतंय. मला नेहमीच नेटफ्लिक्ससोबत काम करायचं होतं आणि तेही नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली म्हणजे सोने पे सुहागा! मुंबई विमानतळावर शूटिंग करणं आणि संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष काम करताना पाहणं हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता.”

आता इमरान हाश्मी अभिनित “तस्करी” ही नवी वेब सीरिज येत्या 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, याचबरोबर अमृता 23 जानेवारीपासून डिस्नी हॉटस्टारवरील ‘स्पेस जेन – चंद्रयान’ या आगामी प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे. अभिनेत्रीने एकामागोमाग धमाकेदार प्रोजेक्ट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Amruta khanvilkar upcoming hindi web series taskaree releasing on netflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ
1

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ

Exclusive: हळद पिवळी पोर कवळी…! एतशा संझगिरीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
2

Exclusive: हळद पिवळी पोर कवळी…! एतशा संझगिरीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर

साप- विष प्रकरण एल्विश यादवला पडलं महागात; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही”
3

साप- विष प्रकरण एल्विश यादवला पडलं महागात; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही”

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका
4

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Feb 22, 2026 | 07:05 AM
‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

Feb 22, 2026 | 06:15 AM
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

Feb 22, 2026 | 05:30 AM
Sangali News : मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार! मेळाव्यात साधक-भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग

Sangali News : मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार! मेळाव्यात साधक-भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग

Feb 22, 2026 | 04:15 AM
Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…

Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…

Feb 22, 2026 | 02:35 AM
35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Feb 22, 2026 | 12:30 AM
“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Feb 21, 2026 | 10:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.