भारतात अनेक गावं वसली आहेत. यातील बरीच गावं आपल्या विशेष कारणासाठी ओळखली जातात. अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या गावाबद्दल माहिती सांगत आहोत, ज्याची खासियत म्हणजे इथे लोकांना त्यांच्या नावाने नाही तर गाण्यातील सुरांनी हाक मारली जाते. गावाच्या या खासियतमुळेच त्याला 'व्हिसलिंग व्हिलेज' असेही म्हटले जाते. चला तर मग हे अनोखे गाव कुठे वसले आहे ते जाणून घेऊयाय
Whistling Village: भारतातील अनोखे गाव जिथे लोकांना नावाने नाही तर गाण्याच्या ट्यूनने आवाज दिला जातो
आम्ही ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते गाव मेघालयात वसले असून त्याचे नाव कोंगथोंग असे आहे. हे गाव मेघालयची राजधानी शिलाँगपासून ६० किमी अंतरावर आहे
कोंगथोंग गावाचे लोक एकमेकांना नावाने नाही तर गाण्याच्या स्वरांनी एकमेकांना हाक मारतात. हेच कारण आहे की याला 'व्हिसलिंग व्हिलेज' नावाने ओळखले जाते
या गावातील लोकांना दोन नावे आहेत. एक म्हणजे त्यांचे सामान्य नाव आणि दुसरे म्हणजे त्यांचे गाण्याच्या सुरांचे नाव
गाण्याचेही यात दोन प्रकार आहेत, एक म्हणजे लांब गाणे आणि दुसरे म्हणजे एक छोटे गाणे. लहान गाणे घरात वापरण्यासाठी आहे तर मोठे गाणे हे बाहेर वापरण्यासाठी आहे
कोंगथोंग गावात सुमारे ७०० लोक राहतात. म्हणजेच इथे ७०० लोकांचे ७०० सूर असावेत. इथे नवीन जन्मलेल्या मुलाला पालक स्वतःच नवीन सूर देतात