थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवरील चमक काहीशी कमी होऊन जाते. कारण हिवाळ्यामध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी महागडे मॉइश्चरायझर किंवा सिरम लावले जातात. पण तरीसुद्धा त्वचा चांगली दिसत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला स्किन केअर प्रॉडक्ट लावून चमकदार ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे सर्व उपाय करण्याऐवजी आहारात बदल करून चेहऱ्याची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते? मग रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडो सॅलड, सँडविच किंवा एवोकॅडो टोस्टचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. एवोकॅडो निरोगी चरबी आणि विटामिन ई भरपूर प्रमाणात आढळून येते.
उपवासाच्या दिवशी रताळ खाल्ले जाते. रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, ज्यामुळे त्वचेच्या पेशी कायमच निरोगी राहतात. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी रताळ्याचे सेवन करावे.
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळांचे नेहमीच सेवन करावे. संत्री, मोसंबी, आवळा इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील आणि आरोग्यासोबतच केस आणि त्वचा हेल्दी राहील.
बदाम, अक्रोड, चिया बियाणे आणि अळशीच्या बिया नियमित खाल्ल्यास तुम्ही कायमच हेल्दी आणि मजबूत राहाल. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि चेहरा सुंदर दिसतो.
नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी आठवड्यातून दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे असतात.