दिवाळी हा एक असा सण आहे जो प्रत्येक भारतीयाला आपलासा वाटतो. या काळात अनेक जण आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटतात. त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन जातात. कित्येक जण या काळात स्वतःचा बिझनेस सुरु करून आयुष्याची नवी सुरुवात करत असतात. पण दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. यावेळी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. पुढे काही मुख्य चुका दिल्या आहेत ज्या दिवाळीत टाळल्या पाहिजेत.
या चुका कमी करतील दिवाळीची मज्जा (फोटो सौजन्य: iStock)
दिवाळीत घराची स्वच्छता आणि सजावट करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशुभ मानले जातेच पण यामुळे रोगराई सुद्धा पसरली जाते.
फटाक्यांचा उपयोग करताना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा विचार करावा लागतो. त्यामुळे शांती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन फटाके वापरा.
फराळ बनवताना किंवा खरेदी करताना त्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्या. खराब किंवा शिळे पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
दिवाळीचा सण म्हणजे एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा काळ आहे. एकटं राहणे किंवा इतरांपासून दूर राहिल्याने सणांचा आनंद कमी होतो.
उत्सवाच्या काळात अनावश्यक खर्च टाळा. बजेट ठरवून त्यानुसारच खरेदी करणे योग्य राहील, ज्यामुळे तुमचा महिन्याचा बजेट कोलमडणार नाही आणि दिवाळी सुद्धा आनंदात जाईल.