आपल्याला नोकरी मिळावी आणि खूप पैसे कमवावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण रोज नोकरीला जाऊन एका क्षणाला कंटाळा येतो. यावेळी आपल्याला असं वाटतं की एखादी अशी नोकरी असावी जिथे मजा देखील येईल आणि प्रचंड पैसे देखील कमावता येतील. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगात अशा काही विचित्र नोकऱ्या आहेत. जिथे तुम्हाला मजा देखील येते आणि पैसे देखील मिळतात. रोजच्या गर्दीतून आणि कंटाळवाण्या दिनचर्येतून तुम्हाला देखील थोडा बदल पाहिजे असेल तर ही बातमी नक्की वाचा. आता आम्ही तुम्हाला जगातील काही विचित्र नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत. या नोकऱ्या वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Weirdest Jobs In World: अशी नोकरी मिळाली तर मज्जाच मजा, कुठे झोपण्यासाठी तर कुठे चिमणी उडवण्यासाठी दिले जातात पैसे
यूकेच्या मिस्टर चिप्स चिप्पी कंपनीने एक अजब नोकरी सुरु केली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तिला चिमणी उडवण्यासाठी तब्बल 20 हजार रुपये दिले जातात.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की तुम्ही झोपून देखील पैसे कमवू शकता. फिनलँडच्या हॉटेलमध्ये एक फुल टाइम प्रोफेशनल स्लीपर काम करतो. हा व्यक्ति रोज हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो आणि बेडचा कंफर्ट रिव्यू देतो.
जगात कार निरीक्षकाच्या नोकरीचाही समावेश होतो. लोक आपली कार दाखवण्यासाठी चांगली रक्कम मोजायला तयार असतात आणि त्यासाठी लोकांना कामावर ठेवतात.
जपानच्या मेट्रोमध्ये इतके लोक प्रवास करतात की तिथले दरवाजे सहजासहजी बंद होत नाहीत. त्यासाठी तेथे पॅसेंजर पुशर्स ठेवले जातात.
चीनमध्ये प्राणीसंग्रहालयात लहान, मोठ्या आणि गोंडस पांड्यांना खायला घालण्यापासून ते झोपेपर्यंत पैसे दिले जातात.
अनेक ठिकाणी इतरांसाठी रांगेत उभे राहण्याचे पैसेही मिळतात. लंडनमधील एक प्रोफेशनल क्विअर इतरांसाठी रांगेत उभे राहून दिवसाला 16,000 रुपये कमावते.