डायटमध्ये जास्त तेलकट आणि बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे लोकांचे खराब कोलेस्टेरॉल वेगाने वाढते. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. अशावेळी ते नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या खाण्यापिण्यात केलेले बदल फार फायदेशीर ठरते. त्यामुळे आपापल्या आहारात आजपासूनच मुळ्याचे सेवन करण्यास सुरुवात करा. मुळ्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
मुळ्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)
मुळ्यातील पोटॅशियम आणि अँथोसायनिन खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. फायबर आणि पाण्याचे प्रमाण रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचे कण स्वच्छ करते.
मुळा हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतो. मुळा धमन्यांना स्वच्छ आणि निरोगी ठेवतो. हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
मुळा डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो. मुळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून शरीर स्वच्छ ठेवतो.
मधुमेह रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे. मुळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी मुळा उपयोगी आहे.
मुळा पचनक्रिया सुधारतो आणि मेटाबॉलिक रेट वाढवतो. त्यामुळे कब्जाची समस्या दूर होते आणि मल मऊ राहतो.