सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा सांध्यांमध्ये वेदना वाढणे, कंबर दुखी, पाठदुखी, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. संधिवाताची समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरात प्युरीनची पातळी वाढल्यानंतर विषारी घटक बाहेर पडून जात नाहीत. हे घटक रक्तामध्ये तसेच साचून राहतात, ज्यामुळे गाऊट होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सांध्यांमध्ये वाढलेले Uric Aacid नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

आंबटगोड चवीची चेरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळून येते. यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी न होता सांध्यांमधील जळजळ कमी होते.

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. रोजच्या आहारात नियमित काकडीचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी इत्यादी अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी ने समृद्ध असलेल्या बेरीजचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि आरोग्य सुधारते.

नियमित एक सफरचंद खाल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. यामध्ये असलेले फायबर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात आणि हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात.

बदाम, अक्रोड, चिया बिया आणि अळशीच्या बियांमध्ये प्युरीनचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये असलेल्या घटकांमुळे जळजळ कमी होऊन शरीराला लगेच ऊर्जा मिळते.






