तासनतास लॅपटॉप, मोबाईल फोन पाहत राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी हळूहळू खराब होऊन कमी वयात अनेकांना चष्मा लागला आहे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया.
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी 'हे' पदार्थ खा
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. यामध्ये विटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे डोळ्यांचे हानिकारक पेशींपासून होणारे नुकसान टळते.
अँटिऑक्सिडेंट युक्त ब्लूबेरी सगळ्यांचं खूप आवडतात. ब्लूबेरी खाल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
केळ्यामध्ये पोटॅशियम आणि विटामिन ए मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. केळी खाल्यामुळे डोळ्यांवरील तणाव कमी होऊन डोळ्यांची सुधारणा होण्यास मदत होते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रताळ खूप आवडत. त्यामुळे मुलांच्या आहारात तुम्ही त्यांना उकडलेलं रताळ खायला देऊ शकता. रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे डोळ्यांचे रक्षण होण्यास मदत होते.
रोजच्या आहारात गाजरचा समावेश करावा. कारण गाजरमध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. गाजर डोळ्यांमधील रेटिनॉल निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.