निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. नियमित एक खजूर खाल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय नियमित एक खजूर खाल्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. पण खजूर खाताना त्याच्या आतील बिया काढून नंतरच खावे. खजूर खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. याशिवाय त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळतो. चला तर जाणून घेऊया खजूर खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
खजूर खाल्यामुळे शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे
नियमित एक किंवा दोन खजूर खाल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. कारण यामध्ये कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीर निरोगी ठेवतात.
खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यांसारखे नैसर्गिक साखर असलेले घटक असतात. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. याशिवाय मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा खजूर खाऊ शकतात.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नियमित एक खजूर खाल्यास वेदनांपासून आराम मिळेल.
खजूर खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होते. कारण यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
फायबर युक्त खजूर खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.