मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या दमदार अभिनयाच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रंगभूमी, दूरदर्शन, छोट्या पडद्यावरील मालिका, मराठी चित्रपट ते बॉलीवूड असा संपूर्ण प्रवास करत अभिनेत्याने यशाचं शिखर गाठलं. सध्या श्रेयस तळपदे अभिनेत्री कंगना रानौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जबरदस्त फोटोशूट केले आहे.
Shreyas Talpade Photos
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा श्रेयस सध्या त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्याने खास फोटोशूट केले आहे.
ऑरेंज कलरचं टी- शर्ट आणि ब्लॅक जीन्स वेअर करून अभिनेत्याने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले आहे. त्याच्या हँडसम लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
सिंपल हेअरस्टाईल, व्हाईट शूज आणि ब्लॅक गॉगलने कॅरी करून अभिनेत्याने स्टायलिश फोटोशूट केले आहे. त्याच्या लूकची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
येत्या १७ जानेवारीला श्रेयस तळपदे स्टारर चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेत्याच्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्याने चित्रपटात स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली असून अभिनेत्याच्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे..
दरम्यान, श्रेयसने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून त्यांच्या फॅशनचे जोरदार कौतुक केले जात आहे.