सर्वच महिला नेहमीच स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता घरातील कुटुंबाची सतत काळजी घेत असतात. मात्र नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, मासिक पाळीतील बदल, शरीरात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिलांनी आरोग्याची काळजी घेताना आहारात कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
प्रत्येक महिलेच्या आहारात असायला हवेत 'हे' पौष्टिक पदार्थ
महिलांनी आरोग्याची काळजी घेताना आहारात ग्रीक दह्याचे सेवन करावे. या दह्यात असलेले प्रथिने, फायबर आणि प्रोबायोटिक्स शरीराला आवश्यक पोषण देतात. याशिवाय हाडांच्या आरोग्यासाठी ग्रीक दही अतिशय प्रभावी आहे.
सकाळी उठल्यानंतर नियमित दोन किंवा तीन बदाम खाल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही बदाम शेक किंवा बदामापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता.
भोपळ्याच्या बिया,चिया सीड्स, अळशीच्या बिया इत्यादी बियांचे आहारात नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, झिंक, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळून येते.
भारतीय जेवणात डाळींचा वापर आवश्यक केला जातो. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ इत्यादी डाळींचा वापर करून जेवणातील पदार्थ बनवले जातात. कारण यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
रोजच्या आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पालक, मेथी, मुळा इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन करावे.