(फोटो सौजन्य: istock)
स्वयंपाकघरात नियमित वापरली जाणारी गॅस रोजच्या वापरामुळे घाण होत असते. तिला वेळेवर स्वछ करणे फार गरजेचे आहे अन्यथा यावर तेलाचे, मसाल्यांचे चिवट डाग बसू शकतात. यामुळे दुर्गंधी आणि जंतूंचा वावर वाढतो, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शिवाय कोणी पाहूणा आपल्या घरात आल्यास आपली घाणेरडी गॅस त्यांच्या नजरेसमोर पडणे लाजिरवाणेही ठरू शकते. चांगले आरोग्य राखण्यासाठी, केवळ स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडेच नव्हे तर त्यातील वस्तूंच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे. घाणेरडा आणि तेलकट गॅस स्टोव्ह स्वच्छ करण्याचे काही सोपे मार्ग आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. या सोप्या, सहज आणि घरगुती उपायाच्या मदतीने तुम्ही कोणतीही मेहनत न करता गॅस स्टोव्हला लगेच साफ करू शकता. यामुळे त्याला नव्यासारखी चमक मिळवण्यास मदत होईल. चला तर मग हा नक्की कोणता उपाय आहे ते जाणून घेऊया.
हा उपाय करून पहा
गॅस स्टोव्हला घरच्या घरी साफ करण्यासाठी सर्वप्रथम १ मोठा कप पाणी एका भांड्यात घेऊन, हे पाणी गरम करा. पाणी गरम होताच यात लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिसळा. आता हे पाणी गॅस स्टीव्हवर पसरवा आणि काहीवेळाने स्क्रॉचच्या मदतीने गॅसच्या साफ करा. हे पाणी गॅसवर टाकताच तेलाचे चिवट डाग सहज निघून जाण्यास मदत होईल. चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही थोडे डिशवॉशिंग डिटर्जंट देखील वापरू शकता.
गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी दुसरा उपाय
यासाठी सर्वप्रथम गॅस स्टोव्हवरून बर्नर काढा. एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला आणि त्यांना नीट मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट गॅस स्टोव्हवर पूर्णपणे लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. आता तुम्ही स्क्रबर किंवा ब्रशचा वापर करून स्टोव्ह सहजपणे स्वच्छ करू शकता. हा एक सोपा, झटपट आणि किफायतशीर असा उपाय आहे जो तुमच्या रोजच्या जीवनात तुमची फार मदत करू शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
गॅस स्टोव्ह घासल्यानंतर कोणत्याही एका स्वछ कापडाने स्टोव्ह पुसून घ्या. आठवड्यातून किमान एकदा गॅस स्टोव्हची व्यवस्थित साफसफाई करणे चांगले असते, जेणेकरून त्यावर अन्नाचा कचरा आणि तेल साठणार नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.