अळशीच्या बियांचे आहारात मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या बियांच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये अळशीच्या बियांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारून पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पण अतिप्रमाणात अळशीच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
अळशीच्या बियांचे अतिप्रमाणात सेवन ठरेल आरोग्यासाठी घातक
अळशीच्या बियांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. पोटात गॅस, सूज येणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार इत्यादी अनेक समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिप्रमाणात अळशीच्या बियांचे सेवन करू नये.
काहींना अळशीच्या बिया खाल्ल्यानंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात अळशीच्या बिया खाऊ नये. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
अळशीच्या बिया रक्त पातळ करण्यास मदत करते पण अतिप्रमाणत सेवन केल्यामुळे रक्त जास्त पातळ होऊन रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे रक्त पातळ करणारी औषध चालू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अळशीच्या बियांचे सेवन करावे.
गर्भधारणेदरम्यान अळशीच्या बियांचे सेवन करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने अळशीच्या बिया खाव्यात. अन्यथा यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
मधुमेह, थायरॉईड किंवा इतर आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अळशीच्या बियांचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.