आज जागतिक पितृदिन म्हणजेच आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर जागतिक बाप दिवस ! एका कुटुंबात वडिलांचे असणेच खूप महत्वाची आणि सुखद गोष्ट असते. खरंतर, असे म्हणतात की बापाची किंमत त्यांनाच विचारावी ज्याच्या आयुष्यात बाप नावाची जागा रिक्त आहे. बाप होण्यात जितका आनंद आहे, तितकेच बाप म्हणून मुलांना उत्तम आयुष्य देण्यात परिश्राम देखील आहे. खासकरून मुलगा आणि बापाचे नाते हे अनेकदा टोमण्यांनी भरले असते. यातीलच काही सर्वसाधारण म्हणजेच वडिलांचे कॉमन वाक्य आज आपण जाणून घेऊयात.
तुम्हीही ऐकले असतील वडिलांचे 'हे' कॉमन वाक्य (फोटो सौजन्य: iStock)
बापाला नको शिकवू: तुमच्या सुद्धा कानावर हे वाक्य अनेकदा पडले असेल. जेव्हा कधी मुलगा आपल्या वडिलांना ठाऊक नसलेल्या गोष्टी सांगायला जातो तेव्हा ते नक्कीच म्हणतात," बापाला नको शिकवतोस?"
तू बाप होशील तेव्हा समजेल: अनेकदा जेव्हा वडिल आपल्या काळजीपोटी काही गोष्टी सांगतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा वडील आपल्याला म्हणतात, "तू बाप हो मग समजेल."
पैशाची किंमत समजा: अनेकदा मुलं नको तिथे पैसे खर्च करताना दिसतात. अशावेळी वडील त्यांना सांगतात पैशाचा योग्य उपयोग आणि बचत शिका !
आमच्या काळात खऱ्या परीक्षा होत होत्या: अनेकदा दहावी आणि बारावीचा निकाल व अभ्यासक्रम पाहिल्यावर वडिलांची एकच रिअॅक्शन असते ती म्हणजे अरे आमच्या काळात खऱ्या आणि कठीण परीक्षा होत होत्या.
बाप आहे तुझा: अनेकदा जेव्हा आपल्या नकळत काही गोष्टी वडिलांना कळतात तेव्हा आपण त्यांना विचारतो की तुम्हाला हे कसे समजले? अशावेळी वडील आपलं ठरलेला वाक्य बोलतात,"बाप आहे तुझा'.