जगात काही रहस्यमय ठिकाणं आहेत, जिथे जाणं म्हणजे आपला जिव धोक्यात घालणं. जसं की, ब्राजीलचा स्नेक आइलँड, भारतचे नॉर्थ सेंटीनल द्वीप आणि ऑस्ट्रेलियाचे हर्ड आइलँड. या ठिकाणी ज्वालामुखी, विषारी सापांचा धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी दिसायला खूप सुंदर, अद्वितीय किंवा ऐतिहासिक आहेत, परंतु सामान्य लोकांना तिथे जाण्यास सक्त मनाई आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील 5 रहस्यमय ठिकाणं, जिथे पसरलय मृत्यूचं संकट! पर्यटकांना प्रवासासाठी नो एंट्री, कारण वाचून उडतील होश!
ब्राजीलधील दा क्वेमादा ग्रांडे म्हणजेच स्नेक आइलँडवर पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. हा द्वीप साओ पाउलोपासून सुमारे 36 किलोमीटर दूर आहे आणि याला जगातील सर्वात धोकादायक ठिकाणं मानलं जातं. ब्राजीलधील दा क्वेमादा ग्रांडे म्हणजेच स्नेक आइलँडवर पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. हा द्वीप साओ पाउलोपासून सुमारे 36 किलोमीटर दूर आहे आणि याला जगातील सर्वात धोकादायक ठिकाणं मानलं जातं.
नॉर्थ सेंटीनल आइलँड अंदमान बेटांवर स्थित आहे. येथे राहणारी सेंटिनेलीज जमात अजूनही आधुनिक जगापासून पूर्णपणे दुरावलेली आहे. ते बाहेरील कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतात.
हर्ड आइलँड हे हिंद महासागरात, दक्षिण ध्रुवाजवळ स्थित आहे. हे बेट पूर्णपणे ज्वालामुखीयुक्त आहे. येथे असलेला बिग बेन नावाचा सक्रिय ज्वालामुखीचा वेळोवेळी उद्रेक होत राहतो.
चीनचे पहिले सम्राट किन शी हुआन यांची कबर ही चिनी इतिहासातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. इथे हजारो सैनिकांचे पुतळे आहेत.
बॅरेन बेट हे अंदमान समुद्रात स्थित भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. येथे मानवी वस्ती नाही.