किंमतीने महाग असलेल्या अक्रोडचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. यामध्ये विटामिन इ, फॅट्स, अमोगो ३ फॅटी ऍसिड, झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, पिंपल्स, वांग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात अक्रोडचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला नियमित अक्रोड खाल्यामळे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
चमकदार त्वचेसाठी आजपासूनच आहारात करा अक्रोडचे सेवन
अक्रोडमध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर दिसून येणारी वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच नियमित अक्रोडचे सेवन केल्यास त्वचा अधिक तरुण दिसू लागेल.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी एक किंवा दोन अक्रोड पाण्यात भिजत ठेवून नंतर सकाळी उठल्यानंतर साल काढून अक्रोडचे सेवन करावे.
नियमित अक्रोडचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. त्वचेवरील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी अक्रोडचे सेवन करावे.
अक्रोडमध्ये असलेले विटामिन इ त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत करतात. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित एक अक्रोड खावे.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी अक्रोडचे सेवन केले जाते. हा पदार्थ टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी मदत करतो.