दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात, यातील काही चित्रपट चालतात तर काही फ्लाॅप होतात. मात्र यातही काही चित्रपट असे असतात जे अनेक वर्षांपर्यंत आपली छाप प्रेक्षकांच्या मनात जशीच्या तशी टिकवून ठेवतात. हे चित्रपट इतक्या सुंदर प्रकारे बनवले जातात की, पुन्हा पुन्हा पाहूनही आपल्याला ते पाहण्यास कंटाळा येत नाही. असाच एक मराठी चित्रपट ज्याने अनेक वर्षांपर्यंत चित्रपटसृष्टी गाजवली तो म्हणजे सर्वांच्या आवडीचा चित्रपट "गाढवाचं लग्न". आजही हा चित्रपट टिव्हीवर लागला तर प्रेक्षक तितच्याच आवडीने त्याला पाहू लागतो. अशात चित्रपटातील मुख्य नायिका आता कशी दिसते ते तुम्हाला माहिती आहे का?
गाढवाचं लग्नमधील गंगी आता कशी दिसते? ट्रान्सफॉर्मशन पाहाल तर फोटोजवर विश्वासच बसणार नाही
२००७ मध्ये रिलिज झालेला "गाढवाचं लग्न" चित्रपट राजू फुलकर यांनी दिग्दर्शित केलेले एक मराठी विनोदी चित्रपट आहे. यात सावळ्या नावाच्या एका कुंभाराची कथा दाखवण्यात आली आहे
सावळा ऋशामुनींच्या मदतीने जिवंतपणीच स्वर्ग पाहून पुन्हा धर्तीवर परततो. पृथ्वीवर परतल्यावर, तो कोणकोणते चमत्कार करतो ते यात दाखवण्यात आले आहे.
दरम्यान चित्रपटात सर्वात गाजलेलं आणि चर्चित पात्र म्हणजे सावळ्याची बायको गंगीच पात्र, जिला अभिनेत्री राजश्री लांडगेने साकारलं होतं. चित्रपटात सावळ्याचं पात्र मराठी अभिनेता मकरंद अनासपुरेने सुंदररित्या निभावलं होतं
चित्रपटात दिसून आलेल्या गंगीने आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली खरी मात्र यानंतर चित्रपटसृष्टीत ती फारशी दिसून आली नाही
पण 18 वर्षांनंतर आता गंगी म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगेचे नवीन फोटोज फार चर्चेत आहेत. अभिनेत्रीचं बदलेलं लूक पाहून आता चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून तिचे हे फोटोज आता इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत