गणेश चतुर्थी हा देशभरात भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे, लाडक्या गणरायाचे आज सर्वत्र आगमन आज झाले आहे. त्यामुळे राज्यात त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. अनेक सेलिब्रेटी कलाकारांनी गणरायाचे स्वागत केले आहे. त्याचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. जाणून घेऊया, कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे.
‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी वाजत गाजत झाले गणरायाचे आगमन
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता आणि अनन्याचे वडिल चंकी पांडे यांच्या घरीही धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १४ फेम अभिनेत्री रुबिना दिलैकच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानीच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अभिनेत्री सारा अली खानच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही घरी धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
गरीबांचा मसिहा आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्याही गणरायाचे आगमन झाले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया