दिवाळी सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्री उत्सव संपल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये दिवाळी सण येतो. दिवाळी म्हंटल की सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. दिवाळीच्या आधीच संपूर्ण शॉपिंग करून नवीन कपडे घेतले जातात. खास करून महिला दिवाळी सण येण्याच्या १ महिना आधीच कपडे खरेदीसाठी बाहेर निघतात. सणाच्यादिवशी लेहेंगा, साडी, पंजाबी ड्रेस इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीमध्ये कपडे खरेदी करायला गेल्यानंतर कोणते रंगाचे ड्रेस खरेदी करावे, याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-pinetrest)
दिवाळीमध्ये खरेदी करा 'या' रंगाचे सुंदर ड्रेस
सध्या सोशल मीडियावर आइस ब्लू हा रंग खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. हा रंग रात्रीच्या वेळी आणि दिवसा दोन्ही वेळेस अतिशय सुंदर दिसतो. आइस ब्लू सोबत मस्टर्ड रंग तुम्ही परिधान करू शकता.
लाल रंग सर्वच महिलांना आवडतो. त्यामुळे ड्रेस विकत घेताना तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन करून ड्रेस शिवून किंवा रेडिमेड घेऊ शकता.
गुलाबी रंगात अनेक वेगवेगळे शेड बाजारात उपलब्ध असतात. त्यातील तुम्ही डार्क गुलाबी किंवा बेबी पिंक रंगाचा ड्रेस विकत घेऊ शकता. पिंक रंग सर्वच महिलांना खूप आवडतो.
नारंगी रंग सगळ्यांवर खूप सुंदर दिसतो. त्यामुळे नारंगी रंगाची साडी विकत घेतल्यानंतर त्यावर त्यावर तुम्ही हिरवा किंवा गुलाबी रंगाचा ब्लॉऊज घालू शकता.
नेव्ही ब्लू आणि मस्टर्ड यल्लो हे रंग सर्वच त्वचेच्या रंगांवर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. तसेच हे कॉम्बिनेशन परिधान करून तुम्ही जर चारचौघांमध्ये गेलात तर तुमच्या लुकचे सगळेच कौतुक करतील.