आंबट गोड चवीचा पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरू पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. पेरूमध्ये असलेले विटामिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट्स त्वचा आणि शरीराला खूप जास्त पोषण देते. तसेच वाढत्या उन्हाळ्यात गर्मीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी पेरूच्या पानांचे सेवन करावे. पेरूसोबतच पेरूची पाने सुद्धा शरीरासाठी खूप जास्त गुणकारी ठरतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरूच्या पानांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पेरू आणि पेरूच्या पानांचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरासाठी वरदान ठरेल पेरू! जाणून घ्या पेरू खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

पेरू खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरूचे सेवन करावे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच शरीरात थंडावा टिकून राहतो.

वजन वाढल्यानंतर अनेक लोक आहारात वेगवेगळ्या सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधांचा समावेश करतात. पण त्याऐवजी पेरूचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होतो आणि झपाट्याने चरबी वितळून जाते.

वारंवार सर्दी खोकला किंवा कफाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी पेरू खाऊ नये. यामध्ये असलेले थंड गुणधर्म सर्दीचा जोर वाढवतात, ज्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडून जाते.

शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पेरूपासून बनवलेले सॅलड किंवा इतर पदार्थ खावेत. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.






