दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यादिवशी आईविषयी प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. याशिवाय आई घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या मुलांची काळजी घेत असते. हा दिवस सर्व मातांना समर्पित केला जातो. आईविषयी प्रेम व्यक्त करताना आईला गोड गोड शुभेच्छा दिल्या जातात. तर अनेक मुलं आपल्या लाडक्या आईला सुंदर सुंदर भेटवस्तू देतात. त्यामुळे मातृदिनानिमित्त आईला तुम्ही सुंदर डिझाइन्सची नोजपिन्स भेटवस्तू म्हणून देऊ शकता. नोजपिन्स घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. नाकामध्ये नोजपिन्स घातल्यानंतर लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. मातृदिनानिमित्त आईला या सुंदर नोजपिन्स नक्कीच भेटवस्तू म्हणून द्या. (फोटो सौजन्य – pinterest)
नाकात शोभून दिसतील 'या' डिझाईन्सच्या सुंदर नोजपिन्स
बाजारात ऑक्सिडाइज नोजरिंग्स उपलब्ध झाल्या आहेत. या नोजरिंग्स कोणत्याही कपड्यांवर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात.
सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच नाकामध्ये नथ घालतात. पारंपरिक दागिना म्हणून नथीची सगळीकडे ओळख आहे. त्यामुळे मातृदिनानिमित्त आईला तुम्ही खास भेटवस्तू म्हणून नथ भेट देऊ शकता.
अनेक महिला नाकात फुली घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही या डिझाइन्सची नोजरिंग आईला भेट देऊ शकता. सोन्याची साधी सिंपल गोलाकार नथनी आईला खूप जास्त आवडेल.
गोलाकार नोजरिंग बनवताना डायमंड्सचा वापर केला जातो. काहींना डायमंडचे दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळे छोटीशी डायमंड नोजरिंग आईला भेटवस्तू म्हणून नक्की द्या.
नाकामध्ये सुंदर फुलांची नोजपिन्स अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते. याशिवाय नोजरिंग्स बनवताना त्यात वेगवेगळ्या रंगीत खड्यांचा वापर केला जातो.