कियारा अडवाणी आपल्या अभिनयामुळे तर ओळखली जातेच पण त्याव्यतिरिक्त तिच्या मनमोहक अंदाजामुळे ती नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करीत असते. कियाराने आपल्या विशेष पेहरावात काही खास फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटोज शेअर केल्यावर अवघ्या काही मिनिटातच चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
आपल्या मनमोहक अंदाजात पुन्हा दिसली कियारा(फोटो सौजन्य: Instagram)
कियाराने सोशल मीडियावर अनेक फोटज शेअर केले आहे. या फोटोजमधील तिचा प्रत्येक पोज हा मनमोहक वाटत आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने आपल्या घरी दिवाळीची पार्टी अरेंज केली होती ज्यात कियाराने सुद्धा हजेरी लावली होती.
या पार्टीत कियारा आपल्या मोहक अंदाजात दिसली. तिने नेसलेली साडी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती. ही साडी मनीष मल्होत्राने स्वतः डिझाइन केलेली आहे.
कियाराने शेअर केलेल्या फोटोजमध्ये तिची नॅचरल ब्युटी पाहायला मिळत. ज्यामुळे चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
कियारा लवकरच डॉन 3 या आगामी चित्रपटात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरान अख्तर करणार आहे.