बांगलादेशचे पितळ उघडे! उस्मान हादीचा मारेकरी भारतात नाही तर दुबईत लपला; स्वतःच जारी केला व्हिडिओ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Osman Hadi murder case latest news 2025 : बांगलादेशातील (Bangladesh) प्रभावशाली तरुण नेते आणि ‘इन्कलाब मंच’चे प्रवक्ते उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या हत्येप्रकरणी आता एक अत्यंत नाट्यमय वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद हा भारतात पळून गेल्याचा दावा बांगलादेश सरकारने आणि ढाका पोलिसांनी केला होता. मात्र, आता फैसलने स्वतः एक व्हिडिओ जारी करून बांगलादेशच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. फैसल भारतात नाही, तर चक्क दुबईमध्ये सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
उस्मान हादी यांच्यावर १२ डिसेंबर रोजी ढाक्यात गोळीबार झाला होता, त्यानंतर १८ डिसेंबरला सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ढाका महानगर पोलिसांनी असा दावा केला होता की, मुख्य संशयित फैसल करीम मसूद हा हलुआघाट सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात पळून गेला आहे. भारताने मात्र हा दावा फेटाळून लावला होता. मेघालयातील बीएसएफ (BSF) महानिरीक्षकांनी स्पष्ट केले होते की, सीमेवरून कोणतीही घुसखोरी झाल्याचा पुरावा नाही. आता फैसलच्या व्हिडिओने भारताची बाजू अधिक भक्कम केली असून बांगलादेश पोलिसांचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट
दुबईतून जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये फैसल करीम मसूदने स्वतःला निर्दोष जाहीर केले आहे. तो म्हणतो, “उस्मान हादी यांच्या हत्येशी माझा कोणताही संबंध नाही. केवळ व्यावसायिक कारणांमुळे आमचा संपर्क होता. मी एक आयटी कंपनीचा मालक असून, व्यवसायासाठी काही राजकीय देणग्या दिल्या होत्या, पण तो कोणत्याही कटाचा भाग नव्हता.” फैसलने पुढे एक खळबळजनक दावा केला की, उस्मान हादी ज्या ‘जमात’ संघटनेशी संबंधित होते, त्या संघटनेतील अंतर्गत वादातून किंवा राजकीय द्वेषातून त्यांची हत्या झाली असावी. आपल्या जिवाला धोका असल्याने आपण दुबईला गेल्याचे त्याने सांगितले.
Faisal Karim Masud, one of the key accused in the Osman Hadi murder case, said in a video message that he is currently in Dubai and has no involvement in the killing. He claimed that the murder was carried out by Jamaat-Shibir. According to Faisal, his association with Hadi was… pic.twitter.com/vghSIAILJE — Sahidul Hasan Khokon (@SahidulKhokonbd) December 30, 2025
credit : social media and Twitter
मिळालेल्या माहितीनुसार आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार, फैसल करीम मसूद खरोखरच दुबईमध्ये आहे. त्याच्याकडे डिसेंबर २०२२ मध्ये जारी केलेला पाच वर्षांचा मल्टिपल-एन्ट्री युएई (UAE) व्हिसा आहे. त्याने कायदेशीररित्या विमान प्रवास करून दुबई गाठली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, तो भारतात पळाल्याचा दावा करून बांगलादेश सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या
उस्मान हादी हे बांगलादेशातील अलिकडच्या जनआंदोलनानंतर एक अत्यंत प्रभावशाली युवा नेते म्हणून समोर आले होते. आगामी संसदीय निवडणुकीत ते उमेदवारही होते. त्यांच्या हत्येमुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आता मुख्य आरोपीनेच व्हिडिओ जारी करून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केल्यामुळे, या हत्येचे गुढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणातील सत्य शोधण्याऐवजी भारतावर आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्या बांगलादेश सरकारला आता जागतिक स्तरावर उत्तर द्यावे लागणार आहे.
Ans: उस्मान हादी हे बांगलादेशातील 'इन्कलाब मंच'चे नेते होते. १२ डिसेंबर रोजी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Ans: बांगलादेशने तो भारतात पळाल्याचा दावा केला होता, परंतु स्वतः व्हिडिओ जारी करून त्याने तो दुबईमध्ये असल्याचे सिद्ध केले आहे.
Ans: त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगत, हत्येमागे उस्मान हादी यांच्याच संघटनेचा (जमात) किंवा राजकीय कटाचा हात असल्याचा दावा केला आहे.






