(फोटो सौजन्य – istock)
मुंबई मनपा येथील डॉ दक्षा शहा (कार्यकारी आरोग्य अधिकारी) यांनी म्हटले की, “८८ प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून २०२५ मध्ये कार्यक्रम आखण्यात आले होते. ते सर्व उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी ठरत आहेत. हेच कार्यक्रम आणि काही नवीन योजना घेऊन २०२६ या वर्षात पालिका आरोग्य विभाग काम करेल.”
रुग्णांना उपचार आणि फॉलोअपसाठी मदत
फेब्रुवारी २०२५ मध्ये कर्करोग प्रकल्प सुरू करण्यात आला आतापर्यंत ३ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे पुढील तपासणी कार्यवाही सुरू आहे.
प्रतिसाद चांगला असल्याचे सांगण्यात आले. त्या रुग्णांना उपचार आणि फॉलोअपसाठी मदत करण्यात येत आहे.
स्वस्त दारात होत असणाऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पालिका मदत करणार आहे. हा प्रकल्प पालिकेकडून कायम सुरूच राहणार आहे.
२०२५ मधील उपक्रम
आशा वर्कर्स यांची मदत
पालिकेने आशा वर्कर्सना प्रशिक्षण दिले असून त्या घरोघरी जाऊन जागरूकतेचे काम करत आहेत. तसेच त्या ‘डोजर टू डोअर’ रुग्ण ओळख करत आहेत. प्रत्येक शनिवारी-रविवारी पालिकेच्या मॅटर्निटीमध्ये संशयित रुग्णांना आणून स्त्रीरोग हरक्षकडून तपासण्या केल्या जात असून यात ३० वर्षावरील महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






