मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ही सध्या तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे बरीच चर्चेत आहे. शहनाजने नुकतेच कांजिवरम साडीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
साडीतील शहनाज अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करीत आहे. शहनाज नुकतीच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील फिल्म फेअर अवॉर्ड्स मध्ये गेली होती. त्या पुरस्कार सोहोळ्यासाठी तिने हा लुक केला होता.
शहनाज ही पंजाबी सिनेमातील अभिनेत्री असून ती बिगबॉस या हिंदी रिऍलिटी शो मधून प्रकाशझोतात आली होती. शहनाज आणि हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ह्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शहनाज ही सध्या अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करीत आहे.