जगभरात 10 फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी हा डे साजरा केला जातो. या दिवशी अनेक जोडपे एकमेकांना छानछान टेडी बिअर गिफ्ट करतात. गोड, गुबगुबीत आणि आपसाला वाटणारा टेडी प्रत्येक वयाच्या लोकांना खूप जास्त आवडतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाचे सुंदर सुंदर टेडी विकत मिळतात.मात्र टेडी बिअरच्या रंगांमध्ये हृदयाच्या जवळील काही भावना लपलेल्या असतात. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक रंगाच्या टेडी बिअरचा नेमका काय अर्थ आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
टेडी बिअरच्या प्रत्येक रंगात लपलेल्या आहेत हृदयाच्या भावना
प्रियकराला किंवा हृदयाच्या अगदी जवळच्या व्यक्तीला भेट देण्यासाठी तुम्ही लाल रंगाचा टेडी बिअर निवडू शकता. लाल रंग प्रेम, उत्कटता आणि उत्साह दर्शवतो.
गुलाब रंग मुलींना फार आकर्षित करतो. गुलाबी रंगाचा टेडी देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणे. तुमच्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक करणे, असे या रंगाचा आहे.
नारंगी रंग हा ऊर्जा आणि आशेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे नारंगी रंगाचा टेडी अशाच व्यक्तींना द्या ज्यांच्याशी तुम्ही भविष्यामध्ये नातेसंबंध जोडण्याची आशा व्यक्त करता.
हिरवा रंग ताजेतवाना रंग म्हणून मानला जातो. या रंगाच्या टेडी बिअरचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीची वाट पाहण्यास तयार आहेत.
निळ्या रंगाचा टेडी विश्वासाचे प्रतीक मानला जातो. प्रेम आणि वचनबद्धतेची तीव्रता या रंगामधून दर्शवली जाते. याशिवाय आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुख दुःखाच्या काळात राहण्याचा हेतू निळ्या रंगामागे दडला आहे.