नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांसाठीचे नवीन टॉयलेट बांधण्यासाठी सुमारे $23 दशलक्ष खर्च केले आहेत. नवीन टॉयलेट हे झिरो ग्रॅव्हिटी बाथरुम ब्रेकच्या समस्यांना तोंड देण्यासाठी खास डिझाइन केलेले व्हॅक्यूम टॉयलेट आहेत.
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांसाठीचे नवीन टॉयलेट बांधण्यासाठी सुमारे $23 दशलक्ष खर्च केले आहेत. नवीन टॉयलेट हे झिरो ग्रॅव्हिटी बाथरुम ब्रेकच्या समस्यांना तोंड देण्यासाठी खास डिझाइन केलेले व्हॅक्यूम टॉयलेट आहेत.
पृथ्वीवर तुम्ही जमिनीत खड्डा खणून त्यात शौच केले किंवा सोन्याने बनवलेले बाथरूम किंवा टॉयलेट वापरले तरीही गुरुत्वाकर्षणामुळे तो कचरा खाली खेचला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की अंतराळवीरांसाठी हे किती कठीण असेल? तर जाणून घ्या अंतराळवीर अवकाशातील टॉयलेटमध्ये किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये बाथरूम ब्रेकला कसे जातात.
1961 मध्ये ॲलन शेपर्ड हे अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन बनले. त्यांचा हा प्रवास लहानच होणार होता त्यामुळे लघवी करण्याचा काही प्लॅन नव्हता. पण शेपर्ड रॉकेटवर चढल्यानंतर प्रक्षेपण हे तीन तासांपेक्षा जास्त काळ झाले. अखेरीस त्याने रॉकेटमधून लघवी करण्यासाठी बाहेर पडू शकतो का असे विचारले.
आणखी वेळ वाया घालवण्याऐवजी मिशन कंट्रोलने ठरवले की शेपर्ड त्याच्या स्पेससूटमध्ये लघवी करू शकतो. मग शेपर्डने तेच केले आणि ते त्याच स्थितीत तो तिथे गेला.
सुदैवाने आजकाल स्पेस स्टेशनवर शौचालये आहेत. पुरुषांसाठी पहिले शौचालय 2000 मध्ये बांधले गेले. परंतु महिलांना ते वापरणे अवघड होते.
शौच करण्यासाठी अंतराळवीरांनी एका लहान शौचालयावर बसण्यासाठी मांडीला घट्ट पकडून ठेवणारा पट्टा वापरला आणि त्यांच्या खालच्या शरीरात आणि टॉयलेट सीटमध्ये एक सील तयार केला. ही पद्धत फार चांगले काम करत नव्हती आणि त्यामुळे स्वच्छता ठेवणेही कठीण होते.
या नवीन पद्धतीच्या बाथरूममध्ये हात आणि पाय ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे जेणेकरून अंतराळवीर आरामात लघवी करण्यासाठी बसू शकतात किंवा उभे राहू शकतात आणि नंतर फनेल आणि नळी घट्ट धरून ठेवू शकतात जेणेकरून काहीही बाहेर येणार नाही. शौच करण्यासाठी अंतराळवीर टॉयलेटचे झाकण उचलतात आणि टॉयलेट सीटवर बसतात जसे पृथ्वीवर करता येते तसे.