हॅरी ब्रूक(फोटो-सोशल मीडिया)
Harry Brook made history : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना संपला. या या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने मोठा कारनामा केला आहे. हॅरी ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला पिछाडीवर टाकून ही कामगिरी बजावली.
इंग्लंडचा हॅरी ब्रूकने केवळ ३४६८ चेंडूत ३००० धावांचा टप्पा गाठला. चेंडूंच्या बाबतीत ३००० कसोटी धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटच्या नावावर जमा होता. बेन डकेटने ३४७४ चेंडूचा सामना करत ३००० धावा पूर्ण केल्या होत्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केएल. ऑस्ट्रेलिया संघ फक्त १५२ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांवर गडगडला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १३२ धावांवर गारद केले. इंग्लंडला १७५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, पण इंग्लंडने हे लक्ष्य फक्त ६ विकेट गमावून पूर्ण केले.
२०११ पासून इंग्लंडचा ऑस्ट्रेलियामदये पहिला कसोटी विजय ठला आहे. यामुळे बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरवणारा इंग्लंड दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी, भारतीय संघाकडून बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने एकूण १५ बॉक्सिंग डे कसोटी खेळल्या आहेत, त्यापैकी १० जिंकल्या, ३ गमावल्या आणि दोन अनिर्णित राहिल्या आहेत.






