दिवाळीचा सण नुकताच साजरा झाला आहे. या सणात आपण सर्वांनीच मन भरून मिठाई खाल्ली असेल. भारतीय सणात नेहमीच मिठाई खाल्ली जाते किंवा एखाद्या व्यक्तीस भेट म्हणून दिली जाते. पण जर तुम्ही हेल्थकडे जास्त लक्ष देत असाल तर तुम्हाला जाणवेल की मिठाई खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते. म्हणूनच काही जण फक्त मिठाईचा एक तुकडा खाताना दिसतात. चला जाणून घेऊया मिठाई कशाप्रकारे तुमचे वजन वाढवते.
मिठाई कशाप्रकारे वाढवते वजन (फोटो सौजन्य: iStock)
मिठाईमध्ये जास्त कॅलोरीज असतात. तसेच यात साखर, तूप किंवा लोणी यांच्या मिश्रणामुळे एक छोटा तुकडाही जास्त कॅलोरी कंझ्युम करतो, जो वजन वाढवू शकतो.
मिठाईत असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात अधिक फॅट जमा जमा होतो. परिणामी वजन वाढले जाते.
मिठाईत फायबरचा अभाव असतो. त्यामुळे शरीराला लवकर भूक लागते आणि जास्त खाण्याची प्रवृत्ती निर्माण होते. यामुळे आपण ओव्हरइटिंग सुद्धा करतो.
मिठाईमध्ये फॅट्स आणि साखरेचा एकत्रित समावेश असतो, जो पचवण्यासाठी शरीर वेळ घेते. यामुळे शरीरला अधिक ऊर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा जरी होत असला तरी वजन वाढतच जाते.
मिठाई खाल्ल्याने लगेच चवदार अनुभव होतो, पण त्याचे दीर्घकालिक परिणाम म्हणजे वजन वाढवणे आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचे निर्माण होणे. म्हणून मर्यादित प्रमाणात मिठाई खाणे सोयीस्कर.