यावेळी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. भारतात, दरवर्षी स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवला जातो. यावेळी राष्ट्रगीतही गायले जाते. भारतीय तिरंगा आणि भारताचे राष्ट्रगीत हा सर्व देशवासीयांचा अभिमान आहे. पण तुम्हाला माहित आहे का राष्ट्रगीताचा राज्यघटनेत समावेश केव्हा झाला. चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या संविधानात राष्ट्रगीत कधी समाविष्ट करण्यात आले. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या संविधानात राष्ट्रगीत कधी समाविष्ट करण्यात आले.
भारताच्या संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी जन-गण-मन हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले होते. तेव्हापासून भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे संविधानानुसार राष्ट्रगीत झाले
27 डिसेंबर 1911 रोजी कलकत्ता (कोलकाता) येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात पहिल्यांदा राष्ट्रगीत गायले गेले होते
प्रथम बंगाली भाषेत नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते
राष्ट्रगीताशी संबंधित एक खास गोष्ट म्हणजे त्यांचे बोल आणि सूर आंध्र प्रदेशातील आहेत
भारताच्या राष्ट्रगीतामध्ये प्रामुख्याने 7 राज्यांची नावे आढळतात. ज्यामध्ये पंजाब, सिंधू (सध्याचे पाकिस्तानचे राज्य), गुजरात, मराठा (महाराष्ट्र), द्रविड (दक्षिण भारत), उत्कल (सध्याचे कलिंग) आणि बंग (बंगाल)
देशात कुठेही राष्ट्रगीत वाजले की प्रत्येक भारतीय आदराने उभा राहतो. राष्ट्रगीताचा एकूण कालावधी अंदाजे 52 सेकंद असतो
राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणालाही जबरदस्ती करता येणार नाही
परंतु नियमांचे पालन न करणाऱ्या आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट-1971 च्या कलम 3 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते