प्रयागराजमध्ये 2025 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणारा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हा 45 दिवसांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा कुंभमेळा हिंदूंसाठी खूप मानला जातो. या कालावधीत एकूण सहा शाही स्नान होणार आहे. कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी Kumbh SahAIyak Chatbot देखील सुरु करण्यात आलं आहे. या चॅटबोटच्या मदतीने भाविकांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य - pinterest)
देशात किती प्रकारचे कुंभ आहेत? कधी आणि कुठे केले जातं आयोजन? जाणून घ्या सविस्तर
12 वर्षातून एकदा कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभात स्नानाला विशेष महत्त्व आहे. कुंभमेळा 2025 चे आयोजन प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद येथे गंगा आणि यमुनेच्या संगमावर होणार आहे. तुम्हाला माहित आहे का, देशात किती प्रकारचे कुंभ आहेत? आणि या महाकुंभाचं आयोजन कधी आणि कुठे केलं जात?
कुंभ, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत. सर्व कुंभमेळे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी वर्षातील वेळही खूप महत्त्वाची असते.
कुंभमेळा - प्रयागराज व्यतिरिक्त हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथेही कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा मेळा 12 वर्षांच्या अंतराने साजरा केला जातो. त्यासाठी चारही जागा एक-एक करून निवडल्या जातात.
अर्ध कुंभ - कुंभमेळ्याच्या व्यतिरिक्त, अर्धकुंभ हा दर सहा वर्षांनी साजरा केला जातो. अर्धकुंभ दोनचं ठिकाणी आयोजित केला जातो. ज्यामध्ये प्रयागराज आणि हरिद्वार यांचा समावेश आहे.
पूर्ण कुंभ - 12 वर्षांनंतर साजरा होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात. पूर्ण कुंभ फक्त प्रयागराजमधील संगम किनारी आयोजित केला जातो. अशाप्रकारे, पुढील वर्षी जानेवारी 2025 मध्ये प्रयागराजमध्ये होणारा मेळा केवळ कुंभच नाही तर पूर्ण कुंभ आहे.
महाकुंभ - दर 144 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणतात. हे फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केले जाते. कारण हा कुंभमेळा अनेक वर्षांनी येतो त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.