Diwali 2024: दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या दिवशी अनेकदा लोक एकमेकांच्या घरी मिठाई घेऊन जातात आणि या सणाला मिठाईच्या मागणीत मोठी वाढ होते. दिवाळीत मिठाई वाटून आनंद साजरा केला जातो. यावेळी मिठाईच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ होते. याचा फायदा घेत अनेकजण मिठाईत भेसळ करून बनावट मिठाई विकून नफा कमविण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला नकली मिठाई सहजपणे कशी ओळखू शकतो हे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य - pinterest)
Diwali 2024: दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताय? पण बनावट आणि खरी मिठाई ओळखाल कशी? ही सोपी पद्धत वापरा
संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकदा लोक एकमेकांच्या घरी मिठाई घेऊन जातात आणि पूजेसाठी आणि स्वतःच्या घरासाठी मिठाई देखील खरेदी करतात, त्यामुळे मिठाईची मागणी वाढते.
मिठाईच्या या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेकजण भेसळयुक्त मिठाई विकण्यास सुरुवात करतात. यामुळे आजारांची शक्यता वाढते. जर तुम्हीही दिवाळीत मिठाई खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा टिप्स जाणून घ्याव्यात ज्याद्वारे तुम्ही खऱ्या आणि बनावट मिठाईत फरक करू शकता.
बनावट मिठाईचा रंग अनेकदा उजळ आणि अधिक आकर्षक असतो. मिठाई खूप तेजस्वी किंवा रंगीबेरंगी दिसत असल्यास अशा मिठाईपासून दूर रहा. वास्तविक या मिठाईमध्ये भेसळ करण्यात आली असते त्यामुळे त्याचा रंग खूपच उजळ दिसतो.
दोन वेगळ्या भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये मिठाईचे नमुने घाला. मिठाई गरम पाण्याच्या भांड्यात विरघळली आणि त्याचा रंग बदलला तर त्याचा अर्थ असा होतो की ती मिठाई भेसळ आहे आणि रंग तसाच राहिला तर खरी मिठाई आहे.
पिस्त्याच्या मिठाईत भेसळयुक्त रंगाचा धोका सर्वाधिक असतो. लाडू आणि इतर मिठाईचा रंग पूर्णपणे वेगळा वाटत असेल तर अशी मिठाई घेणं टाळावं. मिठाई हातात घेतल्यास त्याचा रंग हाताला लागत असेल तर अशी मिठाई खरेदी करू नका.
चांदीच्या खरे वर्क ओळखण्यासाठी ते हाताने चोळा. चांदी वर्क जर मिठाईवरून निघाले तर ती खरी आहे आणि मिठाईवरच राहिली तर ती खोटी आहे.