सर्व स्मार्टफोन युजर्स सहसा 1GB ते 2GB दैनिक इंटरनेट डेटा मिळणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. बऱ्याचदा असे घडते की आपला डेटा खूप लवकर संपतो आणि आपले महत्त्वाचे काम अडकते. अशा परिस्थितीत, 1GB किंवा 2GB इंटरनेट डेटा चित्त्याच्या वेगाने कसा संपला असा प्रश्न आपल्याला पडतो. तुमचाही 1GB किंवा 2GB इंटरनेट डेटा लवकर संपत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक सेटिंग सुरु करू शकता. ही सेटिंग चालू केल्यानंतर, तुमचा डेटा संपूर्ण दिवस टिकेल आणि तुम्ही आरामात चित्रपट आणि रीलचा आनंद घेऊ शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: चित्त्याच्या वेगाने संपतोय तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट? टेंशन नको फक्त चालू करा 'ही' सेटिंग

इंटरनेट डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज कराव्या लागतील. याच सेटिंगबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे नेटवर्क आणि इंटरनेट या पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावांनी दिसू शकतो. येथे डेटा सेव्हर मोड निवडा आणि डेटा सेव्हर सक्षम करा.

वरील प्रोसेस फॉलो केल्यानंतर, तुमच्या फोनवर फोटोज अॅप ओपन करा. येथे तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि सेटिंग्ज पर्यायावर जा.

आता येथे बॅकअप वर जा आणि खाली स्क्रोल करा आणि मोबाईल डेटा वापर वर क्लिक करा. इथे पहिला पर्याय जो असेल तो बंद करा.

आता तुमच्या फोनची सेटिंग्ज ओपन करा. येथे सर्च बारमध्ये डेटा वापर टाइप करा आणि सर्च करा.

आता Advertise वर टॅप करा आणि Data Usage वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा बॅकग्राउंड डेटा वापरणारे सर्व अॅप्स दिसतील. अशा परिस्थितीत, तुम्ही ते अॅप्स बंद करू शकता जे तुमच्यासाठी आवश्यक नाहीत.






